मोठी बातमी! मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला…!
मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दादरमधील शिवाजी पार्क परिसरात अज्ञातांनी देशपांडेंवर हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कमध्ये गेलेले असताना त्यांच्यावर स्टंप आणि लोखंडी रॉडने हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांना तात्काळ हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेत. दुसरीकडे या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Views:
[jp_post_view]