भाजपमुळे आशियातील सर्वात श्रीमंत पुणे महापालिका कर्जबाजारी; अजित पवार कडाडले, थेट भाजपवर साधला निशाणा…


पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या अनेक तऱ्हा सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळत आहेत. तर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. सुरुवातीला या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. मात्र, ही चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली होती.

मात्र, आमदार रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याने पुन्हा ह्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. आता, स्वत: अजित पवार यांनीच दोन राष्ट्रवादी एकत्र येत निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली आहे.

अशातच आता पुण्यात महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळवडे येथे जाहीर सभा घेऊन रणशिंग फुंकले आहे. या सभेत त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचे आणि गुंडगिरीचे आरोप करत जोरदार हल्लाबोल केला.

गेल्या २५ वर्षात आपण कधीही फोडाफोडीचे घाणेरडे राजकारण केले नाही, मात्र आता शहरात भीती दाखवून राजकीय नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अशा दबावतंत्राला अजिबात भुलू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

       

राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना पुणे पालिकेवर कधीही कर्ज घेण्याची वेळ आली नव्हती. एकेकाळी आशियातील सर्वात श्रीमंत असलेली ही महापालिका आज भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्जबाजारी झाली आहे. आमच्या काळात प्रशासनावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, परंतु आता शहरात पोलिसांचा धाक उरला नसून उघडपणे धमकावण्याचे प्रकार वाढल्याची टीका त्यांनी केली.

शहराचे वैभव परत मिळवण्यासाठी पारदर्शक कारभाराची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या सभेत अजित पवार यांनी एक भविष्यकालीन राजकीय अंदाजही वर्तवला. २०२९ पर्यंत ५ आमदार आणि विधानसभेत ९६ महिला आमदार असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावे आणि कोणाच्याही अमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावावा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!