Ashok Pawar : अवकाळी पावसाचा फटका, शेतकऱ्यांसह नर्सरी व्यावसायिकांना मदत जाहीर करा, आमदार अशोक पवार यांची मागणी..
Ashok Pawar : काल आमदार अशोक बापू पवार यांनी विधानसभे मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी याविषयी विधिमंडळात लक्षवेधी मांडून सरकारची लक्ष वेधले. शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
गेल्या दोन दिवसांपूर्वी उरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांसह नर्सरी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. यामुळे आमदार अशोक पवार यांनी पावसाळी अधिवेशनात याबाबत मदत देण्याची मागणी केली आहे. Ashok Pawar
आमदार अशोक बापू पवार यांनी विधानसभेमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी याविषयी विधिमंडळात लक्षवेधी मांडून सरकारची लक्ष वेधले आहे. याबाबत लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी त्यांनी मागणी केली आहे.
पूर्व हवेलीमध्ये पुणे सोलापूर रोडला नर्सरीचे हब आहे. याठिकाणी सोरतापवाडी तसेच गणेगाव मांडवगण याठिकाणी देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. काही शेतकरी बाहेरच्या देशातून रोपे खरेदी करतात, त्याला मोठा खर्च आहे. मात्र या पावसात याचे देखील नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मिळाले नाही. तसेच शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर चोरीला जात आहेत. याकडे कोणाचे लक्ष नाही. यावर सरकारने लक्ष घालने गरजेचे आहे.