धक्कादायक! वयाच्या 20 व्या वर्षी अशोक खरातची लाजिरवाणी कृत्ये; महिला नातवाईकासोबत गैरप्रकारानंतर गावकऱ्यांनी दिला धडा…


नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात वाईट कृत्यांची यादी दिवसागणिक मोठी होत आहे. आता अनेक महिलांनी अशोक खरातवर गंभीर आरोप केले आहेत. पण वयाच्या 20 व्या वर्षीच खरातने नातेवाईक महिलेसोबत नको ते कृत्य केलं होतं.

आता पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत असताना आणखी एक मोठं आणि धक्कादायक रहस्य समोर आलं आहे. अशोक खरातचं 46 वर्ष जुनं प्रकरण देखील आता समोर आलं आहे. 1980 मध्ये भोंदूबाबाने कुटुंबातील महिलेचं लैंगिक शोषण केलेलं… त्यानंतर तो गावातून फरार झाला.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरण तब्बल 46 वर्षांपूर्वीचे आहे. 1980 साली, जेव्हा अशोक खरात अवघा 20 वर्षांचा होता, त्यावेळी त्याच्यावर महिला नातवाईकासोबत गैरकृत्य केल्याचा आरोप होता.

या घटनेनंतर तो जवळपास 15 वर्ष गावातून फरार राहिला होता. सध्या पोलीस त्याचे सर्व जुने रेकॉर्ड तपासत असल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक उर्फ लक्ष्मण खरात हा 20 वर्षांचा असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका महिलेचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे.

संबंधित महिला त्याची दूरची नातेवाईक होती. महिलेला अपत्य होत नसल्याचा फायदा घेत, तिला जादूटोणा आणि तावीज-विधींच्या नावाखाली फसवण्यात आले. या विश्वासाचा गैरवापर करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खरात याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची बाब उघड होताच संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली होती. या घटनेमुळे गावातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते.

रागाच्या भरात गावकऱ्यांनी त्याला मारहाणही केल्याची माहिती समोर येते. या घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत खरातने एका रात्रीत गाव सोडले. त्यानंतर तब्बल 15 वर्ष तो कुठे होता, कोणाच्या संरक्षणात होता आणि काय करत होता, याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती समोर आलेली नसून ते एक मोठे रहस्यच राहिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!