अशोक खरातच्या अडचणी वाढल्या! तब्बल 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, पण उद्या पुन्हा हजर करणार, नेमकं घडलं काय?


नाशिक: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे अनेक कारनामे उघडकीस येत असताना आता त्याच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे.खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आता पुन्हा 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी देण्यात आली आहे.मात्र दुसऱ्या गुन्हासाठी त्याला पुन्हा एकदा उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्याला काय शिक्षा दिली जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि पीडित महिलांचं लक्ष लागलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याने महिलांचे केलेले लैंगिक शोषण, केलेली त्यांची फसवणूक उघडकीस आल्याने त्याला अटक करण्यात आली.29 मार्च रोजी खरातला कोर्टात हजर केलं होतं. त्यानंतर कोर्टानं खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करत 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढविली होती. खरात तपासात सहकार्य करत नसल्याचं समोर आलं होतं.

दरम्यान खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून त्यात राजकीय व्यक्तींची नावे दुसऱ्याच्या नावाने सेव्ह केल्याचा संशय आहे. आज मात्र कोर्टानं पोलीस कोठडी न देता न्यायालयीन 14 दिवसांची कोठडी दिली आहे. ही कोर्टातील सुनावणी अवघी 7 मिनिटात पूर्ण झाली.कोणताही मोठा युक्तिवाद झाला नाही. अशोक खरातला यापूर्वी तीन वेळेस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत त्याला न्यायलयीन कोठडी मिळणार असल्याचे म्हटले जात होते.

दरम्यान खरातविरोधात इतरही गुन्हे दाखल आहेत. गुरुवारी 2 एप्रिल रोजी त्याला इतर दुसऱ्या गुन्ह्यात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडी मिळावी असा प्रयत्न एसआयटीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या कोर्टात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!