अशोक खरातचे फासे फिरले!160 GB डेटा रिकव्हर अन् कोडवर्ड लागला हाती, धक्कादायक उलगडा..

पुणे : महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकच्या भोंदू बाबाचे फासे आता फिरले आहेत. सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीत आहेत. विशेष तपास पथकाकडून छापेमारीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या डिजीटल उपकरणांमधून खरातचे धक्कादायक सत्य बाहेर आले आहे. घराच्या कार्यालयातून 160 GB डेटामध्ये लैंगिक अत्याचाराचे पुरावे सापडले असून त्याचा कोडवर्डही हाती लागला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आता आणखीन वाढ होणार आहे.

महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार करणाऱ्या या खरातच्या प्रत्येक पुराव्याला A, B, C कोडवर्ड असे कोडवर्ड आहेत.यातील ‘A’ असा कोडवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाचे आणि अत्याचाराचे स्पष्ट संकेत देणारे व्हिडिओ व चॅट्स सापडले आहेत. हा सर्व डेटा नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या काळातील आहे. यामध्ये अशोक खरातने केलेल्या अनेक संशयास्पद व्यवहारांचा आणि संवादांचा समावेश आहे.
या खरात प्रकरणात नाशिकच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीने आता तांत्रिक पुराव्यांसोबतच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. अशोक खरातच्या कार्यालयातून जप्त केलेले 16फोल्डर त्याच्या विरोधात न्यायालयात भक्कम पुरावा ठरणार आहेत.

दरम्यान अशोक खरातच्या भोंदूगिरीच्या नावाखाली चालणाऱ्या या प्रकारामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. खरातच्या भोवतीचा फास आणखीन आवळणार आहे.
