अशोक खरात बड्या सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा, धक्कादायक माहितीने सगळे हादरले..


मुंबई : भोंदूबाबा अशोक खरात याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे होते. या बड्या अधिकाऱ्यांना एकमेकांच्या फॅमिली शेअर करायला सांगायचा, असा स्फोटक दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या दाव्यानंतर आता चर्चांना उधाण आले असून यामध्ये अजून मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

त्यांनी सांगितले की, अनेक सरकारी अधिकारी आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना घेऊन अशोक खरात याच्याकडे जात होते. जे पती आपल्या पत्नीला खरात कडे पाठवत होते, ते पती पण तितकेच दोषी आहे. त्यांची पण चौकशी करून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. अशोक खरात याच्या मोबाईलमध्ये सांकेतिक भाषेत कोडवर्डमध्ये काही नेत्यांची नावं लिहली आहे.

तसेच खरात अनेकांचे काळे पैसे पांढरे करायचं काम करत होते. मात्र, त्याने काही फरक पडत नाही. जे या कृत्यात सहभागी आहे त्या सर्वांची चौकशी करायला पाहिजे. अनेकांच्या मोठमोठ्या लोकांच्या बायका अशोक खरात याच्या ऑफिसमध्ये जात होत्या. त्यांचे नवरे बाहेर बसून राहायचे. हे अधिकारी भोंदूगिरीला, अंधश्रद्धेला समर्थन द्यायचे.

तसेच आतमध्ये काय झाले, याबद्दल मी बोलणार नाही, त्याचे पुरावे माझ्याकडे नाहीत. सध्या समोर येणारे व्हिडीओ सिलेक्टेड आहेत. फक्त रुपाली चाकणकर यांना समन्स देऊन चालणार नाही, तर ज्या ज्या 49 आमदारांचे फोटो अशोक खरात सोबत आहे, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

हे किती घाणेरडं आणि महाराष्ट्राची इभ्रत काढणारं प्रकरण आहे. तरीही राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही, खरात हा अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना एकमेकांच्या बायका शेअर करायला सांगायचा, यामुळे आता यामध्ये सर्वांचा तपास होणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!