चौकशीचा फास आवळताच अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला, आज न्यायालयात हजर करणार..


पुणे : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर दररोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. अटकेनंतर सुरुवातीला खरात पोलिसांशी उद्धटपणे आणि त्यांनाच उलट शाप देत होता. मात्र आता आपला पाय आणखीन खोलात गेल्याची जाणीव खरातला कोठडीत होऊ लागली आहे. चौफेर बाजूने चौकशीचा फास आवळताच कोठडीत खरात दोन-तीन वेळेस चक्क ढसाढसा रडल्याची माहिती समोर आली आहे.

महिलांचे लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर पहिल्या आठवड्यात तो प्रचंड माजावलेला होता. मात्र चौकशीनंतर त्याचा सगळा माज उतरला आहे. खरात भोवती चौकशीचा फास आवळला गेल्याने आणि सर्व बाजूने कोंडी झाल्याने खरातचा थयथयाट थांबला असून, दोन-तीन वेळा तो कोठडीत रडला आहे.

दुसरीकडे खरातच्या काळ्या कारनाम्याची खडान खडा माहिती असलेली त्याची पत्नी कल्पना खरात गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. चौकशीचा ससे मीरा लागल्यानंतर ती गायब झाली असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. मात्र तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान खरातची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने भोंदू आज (बुधवारी दि. ८) नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. एकूण 12 गुन्ह्यांपैकी दोन नंबरच्या गुन्ह्यात खरातला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

तसेच खरातने पीडितेवर अत्याचार करून तीला गर्भवती केले नंतर तीचा गर्भपात केला, अशा स्वरूपाचा गुन्हा खरातवर आहे. आजची सुनावणी देखील सुरक्षेच्या कारणाने ऑनलाइन व्हावी, अशी विनंती एसआयटीने केली आहे.खरातच्या आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!