Ashok Chavan : मोठी बातमी! आजच अशोक चव्हाण भाजपमध्ये करणार प्रवेश, वेळ आणि ठिकाणही ठरलं….

Ashok Chavan : राज्यात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असं अशोक चव्हाण म्हणाले होते.
मात्र आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी १२ वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर साडे १२ वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे. मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होणार असून आमदार अमर राजूरकर हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच भाजपमध्ये प्रवेश आहेत. Ashok Chavan
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी१२ वाजता मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. अमर राजूरकर हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच भाजपमध्ये जाणार आहेत.
अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखीही काही आमदार त्यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. आता काँग्रेसचे कोणते नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.