Ashok Chavan : ब्रेकिंग! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा? आजच भाजपात जाण्याची शक्यता….

Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्य झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. Ashok Chavan
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या संपर्क होत नाहीये. शिवाय अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरु आहे. हा नेता काँग्रेसचा बडा नेता असल्याची माहिती आहे.

त्यामुळे अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातच आज आलेल्या या बातमीने अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील याची दाट शक्यता आहे.