Ashok Chavan : अशोक चव्हाणांबाबत बोलताना भाजप खासदाराची जीभ घसरली, म्हणाले, अशोक चव्हाण अजगरा एवढे..

Ashok Chavan : राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसला रामराम ठोकत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला पंधरा दिवस झाले. मात्र अद्यापही भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचे गणित सुटेना झाले आहे. नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपच्या नवनिर्वांचित खासदारांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितत धक्कादायक विधान केले आहे.


खासदार अजित गोपछडे म्हणाले, अशोक चव्हाण साहेब तुम्ही आता आमच्या भाजप पक्षामध्ये आला आहात. त्यामुळे हळूहळू तुम्हाला सर्व सिस्टिम समजायला उशीर लागणार आहे. मात्र मला असे वाटते की तुम्ही आतमध्ये जावून अजगरा एवढे मोठे होता की काय? असं वक्तव्य खासदार अजित गोपछडे यांनी केले आहे. Ashok Chavan
ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही भल्याभल्यांना समजत नाही. मला देखील माहिती नव्हती. खासदारकीसाठी माझं नाव येईल मात्र अचानक माझे नाव आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टी समजून घेण्यासाठी तिचे चिंतन आणि विचार करणे गरजेचे आहे. असे अजित गोपछडे म्हणाले आहेत. यामुळे सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे.
