Ashadhi Wari : आषाढी पायी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, संत ज्ञानेश्वर महाराज्यांच्या पालखीचे 29 जूनला प्रस्थान, जाणून घ्या मुक्काम….
Ashadhi Wari : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचे आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. शनिवार, 29 जून रोजी सायंकाळी 4 वाजता पालखी दशमीला मंगळवार, दि. 16 जुलै रोजी पंढरपुरात दाखल होणार आहे. याबाबत सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांनी माहिती दिली आहे.
याबाबत पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे पालखी सोहळा नियोजन बैठक पार पडली. यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी राजाभाऊ चोपदार, ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर, ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ह.भ.प. भाऊ महाराज गोसावी उपस्थित होते.
29 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान करेल, यावेळी मोठ्या संख्येने वारकरी येण्याची शक्यता आहे. यावेळी मोठा दुष्काळ पडला आहे. रात्री आळंदीतच आजोळघरी गांधीवाडा दर्शनबारी मंडपात मुक्कामी राहील.
30 जून रोजी सकाळी आळंदीतून मार्गस्थ होईल व सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील. 1 जुलै रोजी देखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील. 2 व 3 जुलै रोजी सासवड (ता. पुरंदर) येथे 2 दिवस मुक्कामी असणार आहे. 4 जुलै रोजी जेजुरी, 5 जुलै रोजी वाल्हे, 6 व 7 जुलै रोजी लोणंद येथे दोन दिवस पालखी मुक्कामी राहील. Ashadhi Wari
याठिकाणी माउलींचे निरा स्नान पार पडेल. त्यानंतर 8 जुलै रोजी तरडगाव, 9 फलटण, बुधवार, जुलैला बरड, 11 जुलैला नातेपुते, 12 जुलै रोजी माळशिरस, 13 जुलैला वेळापूर, 14 जुलैला भंडीशेगाव, 15 जुलै रोजी वाखरी, तर 16 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखी सोहळा मुक्कामी पोहोचेल, असा हा प्रवास असणार आहे.