Ashadhi Wari : वारकऱ्यांनी लुटला टाळ व चाळेचा जुगलबंदीचा अनुभव! तमाशा कलावंताकडून वारकऱ्यांची अशीही सेवा..!!

Ashadhi Wari यवत : संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा यवत मुक्काम उरकून वरवंड मार्गस्थ होत असताना संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या चौफुल्यावरील न्यू अंबिका कला केंद्राच्या वतीने वारकऱ्यांची सेवा कला केंद्राच्या वतीने करण्यात येऊन अभंग व लावण्यांची जुगलबंदी रंगून वारकऱ्यांना टाळ व चाळेचा अद्भूत मनोरंजनात भाविकांनी आनंद घेतला.
पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा करण्याची मोठी परंपरा चौफुल्याच्या न्यू अंबिका कला केंद्राने जपली आहे. या कला केंद्राच्या वतीने वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करुन थकलेल्या पावलांना विरंगुळा म्हणून नर्तिका आपली कला सादर करण्याची सेवा करीत आले आहे. Ashadhi Wari
यंदाच्या वर्षीही लावणी कलावंतांनी वारकऱ्यांचा थकवा आणि शीण घालवण्यासाठी लावण्यांचे आयोजन करीत दहा हजार वारकऱ्यांच्याभोजनाची व्यवस्था केली होती. यावर्षीही लावणी कलावंतांनी लावणी व अभंगाचे जुगलबंदी रंगवीत भाविकांना मंत्रमुग्ध केले. या सेवेने भाविकांनीही कलावंताच्या कलेचा आनंद लुटत मनोरंजनाने समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी अंबिका कला केंद्राचे संचालक अशोक जाधव आणि जयश्री जाधव यांनी वारकऱ्यांना भोजनाच्या आणि मनोरंजनाची सेवेसाठी आम्हाला वेगळेच समाधान मिळत असल्याचे सांगितले आहे.