Ashadhi Wari 2024 : ब्रेकिंग! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी, फक्त करा ‘हे’ काम…


Ashadhi Wari 2024 : राज्यामध्ये सर्वत्र आषाढी वारीचा उत्साह दिसून येत आहे. अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचे वेड लागलं असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीच्यादिशेने टाळ-मृदुंगाचा गजर करत, मुखी हरीनाम जपत दिंड्या पंढरीकडे निघाल्या आहेत.

ऊन, पाऊस, वाऱ्यासह निसर्गाच्या विविध संकटांचा सामना करत वारकरी पंढरीकडे पाऊलं टाकत आहेत. तर, एसटी महामंडळानेही हजारो बस पंढरीच्या वारीसाठी सोडल्या आहेत.

या भाविकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी देण्यात आली आहे. आजपासून २१ जुलैपर्यंत ही टोलमाफी असणार आहे. Ashadhi Wari 2024

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गतवर्षी जाहीर केला होता.

कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे गतवर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले, त्याचा विचार करून सरकारने गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी केली होती. आता, यंदाही राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय घेतला असून आजपासूनच पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

२१ जुलैपर्यंत मिळणार टोलमाफी…

पंढरपूरला आषाढी कार्तिकी निमित्त जाणाऱ्या व परत येणाऱ्या पालख्या आणि वाहनांना पथ करातून सूट देण्यात आली आहे. वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी परिवहन विभागातून आवश्यक स्टीकर्स दिले जाणार आहेत.

विशेष म्हणजे ३ जुलै ते २१ जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या आणि पंढरपूरहून गावी जाणाऱ्या सर्वच वाहनांना ही सवलत असणार आहे. दरम्यान, गरज पडल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!