हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक!! आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी, आषाढीला कुर्बानी न देण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्णय


पंढरपूर : सध्या सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. २९ जून रोजी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. पण याच दिवशी मुस्लीम समुदायाचा पवित्र सण बकरी ईदही आहे. दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत.

असे असताना औरंगाबाद जिल्ह्यातील पंढरपूर वाळूज येथील नागरिकांनी बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या पंढरपूर गावातील नागरिकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आली आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव बकरीची कुर्बानी देतात, तर आषाढी वारीला वारकऱ्यांचा उपवास असतो. त्यामुळे हिंदू बांधवांचा अवमान होऊ नये.

यासाठी औरंगाबादमधील पंढरपूर वाळूज येथील गावकऱ्यांनी बकरी ईद आषाढी वारीच्या दिवशी साजरी करण्याऐवजी दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरचे माजी सरपंच शेख अख्तर यांनी सांगितलं की, २९ तारखेला आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे.

त्याच दिवशी मुस्लीम बांधवांची बकरी ईद आहे. त्यामुळे आमच्या गावातील सर्व मौलाना आणि जुम्मेदार लोकांनी असा निर्णय घेतला आहे की, बकरी ईदची कुर्बानी ३० जून रोजी म्हणजेच आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाईल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!