आसाराम बापू दोन बहिणींवरील बलात्कार प्रकरणात दोषी, आज शिक्षा सुनावली जाणार…!


नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंघोषित संत आसाराम बापू चर्चेत आहे. त्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. सुरत येथील आश्रमात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार झाला, असं लहान बहिणीने सांगितले होते.

तसेच मोठ्या बहिणीने तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. अनेकदा आपल्यावर बलात्कार झाला असल्याचे सांगितले गेले आहे.

या प्रकरणी बलात्कार प्रकरणी आसाराम बापू यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. यामुळे याकडे देशाचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने आसाराम बापू यांना दोषी ठरवले आहे. आज त्यांना शिक्षा ठोठावली जाणार आहे.

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात आधीपासूनच आसाराम बापू हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम बापू या दोघांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

गांधीनगर न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू होती. 2013 पासून याबाबत सुनावणी तपास सुरू आहे. अखेर आता याबाबत शिक्षा सुनावली जाणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!