Asaduddin Owaisi : मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात!! ओवैसी मोदींवर टीका करताना अस का म्हणाले?


Asaduddin Owaisi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजावर टीका केली होती. त्याला आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुस्लीम लोक जास्त मुलांना जन्म देतात असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

पण नरेंद्र मोदी यांना सहा भाऊ तर अमित शहा यांना सहा बहिणी आहेत. तसेच राष्ट्रीय संव्यसेवक संघाच्या प्रमुख्यांना 10 ते 12 बहिण भाऊ आहेत. मुस्लीम समाजातील जन्मदराचा आलेख हा घसरता आहे, असे केंद्र सरकारच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे, असे ओवैसी यांनी म्हटलं आहे.

यामुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. तसेच मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोमचा वापर करतात, हे सांगतांना मला कसलाही संकोच वाटत नाही. समाजामध्ये मोदी हे द्वेष पसरण्याचे काम करत आहेत. द्वेषाची भिंत का उभी करत आहात? मुस्लीम लोक सर्वात जास्त मुलं जन्माला घालतात, अशी भीती पसरवली जात आहे. Asaduddin Owaisi

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार मुस्लीम लोकसंख्या वाढीचा दर घसरला आहे. दरम्यान, यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची असणार आहे. काही मतदारसंघ यंदा खूप चर्चेत येत आहेत.

सत्ताधारी आणि विरोधक प्रत्येक मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजावर टीका केली होती, त्याला आता एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे वातावरण गरम आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!