महानगरपालिकेची रणधुमाळी संपताच अजित पवार लागले जिल्हा परिषदेच्या कामाला, बारामतीमधून केला मोठा एल्गार….

बारामती : राज्यात महानगरपालिकेची रणधुमाळी संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषदेच्या कामाला लागले आहेत. आज पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती बारामती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना त्यांनी संबोधित केलं.

आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करताना फॉर्म भरण्यापासून ते आचारसंहितेच्या पालनापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या बाबी स्पष्ट केल्या. नगर उपाध्यक्ष पदाबाबत पक्षाची भूमिका मांडली तसंच संवाद साधताना शिस्त, पारदर्शकता आणि संघटनात्मक ताकद यावर भर दिला.


कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या माध्यमातून शेती व विकासकामांसाठी शिक्षण घेण्याचं शेतकरी बांधवांना सूचित केलं. साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्याच्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याच्या दिशेनं काम सुरू असून, नीरा/कऱ्हा प्रकल्पाचं कामकाज पूर्ण होत असल्याचं यावेळी स्पष्ट केलं.
कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच हे शक्य होत असल्याची भावना व्यक्त केली. आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर विकासकामं उभी करण्याचा संकल्प कार्यकर्ता मेळाव्यात केला. पुढील पाच वर्षांत माळेगाव ही महाराष्ट्रातील आदर्श पंचायत बनेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बारामतीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
