पती जेलमध्ये जाताच साधला डाव! नाशिकमध्ये २० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार, घटनेने उडाली खळबळ..

नाशिक : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिकच्या पंचवटी भागात एका २० वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघकीस आली आहे. आरोपींनी पीडित महिलेला शेतात घेऊन जात अत्याचार केला आहे. पीडित महिलेवर अत्याचार करणारा आरोपी तिचा नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आरोपींनी तिच्या पतीला जामीन देऊन सोडवण्याचे आमिष दाखवले. पीडितेला शेतावर नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी मिळून तिला मारहाण देखील केली.

त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात अत्याचार आणि मारहाण झाल्याची तक्रार केली. अत्याचार करणारी व्यक्ती ही पीडित महिलेचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्या आरोपीनेच पीडितेला आमिष दाखवत शेतामध्ये नेले होते.
दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर फरार असलेल्या एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.