वेगावर ठेवा मर्यादा! राज्यात वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत तब्बल ‘एवढ्या’ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू


पुणे : महाराष्ट्र पोलिसांनी अपघातासंबंधीत एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये राज्यात जानेवारी ते एप्रिल 2023 म्हणजेच वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत 4922 लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे. त्याचबरोबर चार महिन्यांत 6845 जण जखमी झाले आहेत. 2020 मध्ये महाराष्ट्रात रस्ते अपघातात 11, 569 जणांना जीव गमवावा लागला आहे.

तर 2021 मध्ये रस्ते अपघातात 13, 528 लोकांचा मृत्यू झाला. यामुळे वाहन चालवताना काळजी घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, या अहवालात रस्ते अपघातातील मृत्यू आणि जखमींची माहिती समाविष्ट आहे. 2022 मध्ये राज्यात 15 हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.

रस्ते अपघातात जीव गमावलेल्या लोकांपैकी निम्म्याहून अधिक लोक बाइकस्वार आहेत. यामुळे हेल्मेट देखील वापरणे गरजेचे आहे. वाहतुकीचे नियम देखील पाळले पाहिजेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!