निवडणूक मतदार याद्यामध्ये तब्बल 96 लाख बोगस मतदार घुसवले ; राज ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फ़ोट


पुणे : स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तोंडावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव(पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात बोलताना त्यांनी एका मागून एक बॉम्ब टाकले आहेत. निवडणूक मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदार घुसवल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, यापूर्वीच्या निवडणुकीत बोगस मतदार भरलेच होते. आताही मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि इतर शहरात, गावागावात बोगस मतदार, खोटे मतदार भरले आहेत. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.यांना लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये यांना यांची सत्ता हवी असल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. हे सर्व सहज सुरू नाही. सर्वात मोठा प्लॅन आहे. महाराष्ट्राला मुंबई देऊ नका असे पहिले कोण होते, तर वल्लभभाई पटेल हे होते, असे राज ठाकरे म्हणाले. आता त्यासाठी काम सुरू आहे. त्यासाठी आता बोगस मतदार घुसवण्यात येत आहे. त्यांना या सर्व संस्था त्यासाठी हातात हव्या आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

दरम्यान आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन करतो की सतर्क राहा. प्रत्येक गोष्टी टप्प्याटप्प्याने होणार आहे, त्यासाठी मतदार यादी प्रमुखांना मुद्दामहून बोलावल्याचे ते म्हणाले. आमच्या लोकांना सहकार्य करा असे आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केले आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!