पुण्यातील तब्बल 19 जण उत्तराखंडच्या महाप्रलयात बेपत्ता ; शोधकार्य सुरू..

पुणे : उत्तराखडंच्या धारली गावात झालेल्या ढगफुटीने हाहाकार माजला असुन आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रातील अनेक पर्यटक, भाविक सध्या उत्तराखंडमध्ये असून या ढगफुटीमुळे, दुर्घटनेमुळे ते तिथेच अडकले आहेत. त्यात पुणे, सोलापूर, नांदेड अशा विविध भागातील लोकांचा समावेश आहे.यामध्ये आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्दमधील 90 सालच्या बॅचमधील 19 जण बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 1990 सालच्या 10 वी च्या बॅचमधील 8 पुरुष आणि 11 महिलांचा एक समूह पर्यटनासाठी 1ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काल सकाळी या समूहातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात काही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आल्याने त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक सर्वांनाच काळजी वाटू लागली. या महाप्रलयातील बेपत्ता झाले असल्याने शोध कार्य सुरू आहे.
उत्तराखंडातील महाप्रलयमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी स्थानिक प्रशासन, उत्तराखंड पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा तपास घेत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.