धुळ्यात एकाच वेळी तब्बल 12 श्वानांचा अचानक मृत्यू ; परिसरात खळबळ, मृत्यूचं कारण काय?

पुणे: धुळे शहरातील देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ एकाच वेळी 12 श्वानांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या श्वानांच्या मृत्यूचे कारण काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही.मात्र यामुळे नागरिकांसह पालिका प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसापासून धुळे शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या श्वानांमुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता देवपुरातील इंदिरा गार्डन परिसरातील वर्षा बिल्डिंगजवळ 12 श्वानांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांसह पालिका प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. काही श्वान लहान मुलांवर आणि वृद्ध व्यक्तींवर हल्लाही करत असतात. त्यामुळे श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी धुळे महापालिका प्रशासनाकडून श्वान निर्बिजीकरण सुरू करण्यात आले आहे.
या श्वानांचा मृत्यू का झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मानवी हस्तक्षेपामुळे या श्वानांचा मृत्यू झाला का हे तपासणे आता गरजेचे आहे.

दरम्यान नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. नंदुरबारमध्येही श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे

