Pune Crime : घर नावावर करून देत नसल्याने, पोटच्या मुलाकडून आईला गंभीर मारहाण


Pune gokhle nagar Crime : आई घर नावावर करून देत नसल्याने पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात खुर्ची मारून तिला गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील गोखले नगर येथून समोर आली आहे. या प्रकरणी मुलासह त्याची पत्नी, सासू आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपिल दीपक सकट, पायल कपिल सकट (वय २६, दोघे रा. निम्हण मळा, पाषाण) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी यशोदा दीपक सकट (वय ५५, रा. जनवाडी, गोखलेनगर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा सकट यांचा मुलगा कपिल, त्याची पत्नी पायल, तिची आई आणि मेहुणा हे राहते घर नावावर करून देण्यासाठी यशोदा सकट यांना त्रास देत होते.

यावरून दोन दिवसांपूर्वी कपिल व त्याची आई यशोदा यांच्यात मोठा वाद झाला. या वादातून मुलगा कपिल याने आई यशोदा यांच्या डोक्यात लकडी खुर्ची मारून त्यांना गंभीर जखमी केले. यात यशोदा या गंभीर जखमी झाल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!