Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अटक होणार?, ‘आप’ नेत्यांच्या दाव्यानं खळबळ..


Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर त्यांनी चौकशीसाठी जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा अंदाज आदमी पक्षाच्या नेत्यांनी लावला आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी एकामागून एक ट्वीट करत केजरीवाल यांच्या घरी ईडीची छापेमारी आणि त्यांच्या अटकेचा अंदाज लावला आहे. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी देखील एक्स या सोशल मिडीया अकाऊंट वरून पोस्ट केली आहे.

राज्यसभा खासदार आणि आप नेते संदीप पाठक यांनी देखील पोस्ट करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्या सकाळी ईडीकडून छापा टाकण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

दिल्लीत गुरुवारपासून ‘आप’चे जनसंवाद अभियान सुरू होत आहे. केजरीवाल जनसंवाद अभियानातून नागरिकांच्या घरोघरी पोहचणार आहेत. दिल्लीचे सर्व मंत्री, आमदार आणि नगरसेवक प्रचारात सहभागी होणार आहेत.

मात्र प्रचार सुरू होण्यापूर्वी केजरीवाल यांना अटक होण्याची भीती आप नेत्यांना वाटत आहे.दिल्ली दारू घोटाळ्यात ईडी केजरीवाल यांना समन्स पाठवत आहे, पण ते तपास यंत्रणेसमोर जात नाहीत. Arvind Kejriwal

ईडीने केजरीवाल यांना तीन वेळा चौकशीसाठी बोलावले आहे, मात्र दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या नोटीसकडे तीन वेळा दुर्लक्ष केले आहे. केजरीवाल बुधवारी ईडीसमोर हजर होणार होते, मात्र त्यांनी केवळ उत्तर पाठवले.

नोटीस बेकायदेशीर असल्याचे सांगून निवडणुकीपूर्वीच नोटीस का आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी २ नोव्हेंबर आणि २१ डिसेंबरलाही ईडीने केजरीवाल यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!