Arvind Kejriwal : मोठी बातमी! केजरीवालांनी १०० कोटींची लाच मागितली, ED चा मोठा दावा…


Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) राऊस अव्हेन्यू न्यायालयाला सांगितले की, केजरीवाल यांनी मद्य धोरण प्रकरणात १०० कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा पुरावा त्यांच्याकडे आहे.

दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयाने बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी ३ जुलैपर्यंत वाढवली. दरम्यान, नियमित जामीन मिळावा यासाठी केजरीवाल यांच्या याचिकेवर न्यायालयात आज सुनावणी झाली.

सक्तवसुली संचालनालयाने (ED) राऊस अव्हेन्यू न्यायालयाला सांगितले की, केजरीवाल यांनी मद्य धोरण प्रकरणात १०० कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा पुरावा त्यांच्याकडे आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, न्यायालयाने या प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपावर दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे.

हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा- एएसजी एस. व्ही. राजू

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी ईडीची बाजू मांडली. मनी लाँड्रिंगचा गुन्हा घडला आहे. त्याची न्यायालयाने दखल घेतली असून त्याला आव्हान दिलेले नाही. मुद्दा आता केवळ त्यांच्या (केजरीवाल) भूमिकेचा आहे, असे एस. व्ही. राजू यांनी म्हंटले आहे.

या प्रकरणात ‘आप’ला आरोपी बनविण्यात आले आहे. असे अनेक संशयित आरोपी आहेत ज्यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. म्हणजेच हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा असल्याच्या निष्कर्षापर्यंत न्यायालय पोहोचले आहे, असेही राजू म्हणाले.

केजरीवालांनी १०० कोटींची लाच मागितली…

ते (केजरीवाल) सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात आरोपी नसतील. पण ते पीएमएलए प्रकरणात आरोपी असू शकतात. त्यांनी ‘आप’साठी निधी मागितला. अरविंद केजरीवाल यांनी लाच मागितल्याचे सीबीआय तपास करत असलेले हे प्रकरण आहे.

केजरीवाल यांनी १०० कोटी रुपयांची लाच मागितल्याचे सीबीआयच्या तपासातून समोर आले आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!