जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित होणार? मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, नरेंद्र मोदी…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. ते म्हणाले, जोपर्यंत केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत आणता शक्यता नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

एका मुलाखतीत ओमर यांना प्रश्न करण्यात आली की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्संचयित होण्याची शक्यता आहे का? यावर ते म्हणाले की, जोपर्यंत दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे तेपर्यंत जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० पुनर्संचयित केले जाणार नाही.
यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे ओमर अब्दुल्ला यांनी स्वीकारल्यानंतर त्यांचे केंद्र सरकारशी असलेले संबंध अधिक जवळचे झाल्याचे मानले जाते आहे. यामुळे याबाबत आगामी काळात अनेक गोष्टी होऊ शकतात. असेही सांगितले जात आहे. असे असताना मात्र केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, तर त्यांचे सरकार केंद्रासोबतच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन करू शकते, असेही त्यांनी सांगितले आहे.

आम्ही जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा पुनर्संचयित करण्याची आणि संवैधानिक हमी पुनर्संचयित करण्याची मागणी करणारा ठराव विधानसभेत मंजूर केलाआहे. असे असताना मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत कलम ३७० पुनर्संचयित करणे शक्य नाही. ते भारत सरकारला पाकिस्तानशी संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला देण्याचा विचार करत आहेत का? या प्रश्नावर सध्या तरी शक्य नाही, असेही ओमर अब्दुला यांनी म्हटले. तसेच आमच्या सरकारने पहिल्या काही महिन्यांत केंद्रासोबत सहयोगात्मक संबंध प्रस्थापित करणे महत्त्वाचे होते.
माझ्या सरकारच्या पहिल्या काही महिन्यांत तरी मी जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी केंद्र सरकारशी चांगले कामकाजाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असेही ते म्हणाले. तसेच जर ती आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर आम्ही पुनर्मूल्यांकनाचा विचार करु शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आगामी काळात याबाबत राज्यात वेगळे राजकीय वातावरण निर्माण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.