आनंदाची बातमी! पुण्यामध्ये पावसाचे आगमन, ‘या’ भागात मुसळधार पाऊस


पुणे : सध्या पावसाची गरज असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. वातावरणामध्ये अनेक बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी ऊन पडत आहे तर काही ठिकाणी ढगाळ स्वरूपाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. मुंबईमध्ये काल चांगला पाऊस झाला आहे. तसेच आज देखील मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

तसेच आता पुण्यातील कात्रज, कर्वे नगर, चांदणी चौक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील दादर, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, वरळी, मुंबई सेंट्रल या परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील ७२ तासात सलग मान्सून मुंबईत दाखल होईल.

यामुळे शेतकरी देखील सुखावला आहे. आता शेतीची कामे देखील उरकली जात आहेत. यामुळे आता पेरण्या सुरू होतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!