अटक करा, जेलमध्ये टाका, पण बारामतीत मोर्चा काढणारच; लक्ष्मण हाके आक्रमक..


मुंबई : सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्यातील मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी समाज नाराज झाला असून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. तर, दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले असून त्यांनी थेट बारामतीमध्ये ओबीसी आंदोलन मोर्चा काढायचे ठरवले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनास बारामतीमधूनच रसद पुरविण्यात आल्याचा आरोप करत हाकेंनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला आहे. मात्र, पोलिसांनी हाकेंच्या मोर्चाला परवानगी नाकारली असून मला अटक करा, तुरुंगात टाका, असे म्हणत हाकेंनी बारामतीत जाणारच असल्याचे म्हटले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला बारामतीतून रसद पुरवली गेल्याचा आरोप करत हाके यांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही मराठा आरक्षणाला विरोध करत नाही, पण सरकारने काढलेला आताचा जीआर फक्त ओबीसीच नव्हे तर एसी आणि एसटींचेही आरक्षण संपवणारा आहे. घराणेशाही आणि सत्ताधारी वर्गाने पैसा आणि सत्ता यांचे चक्र तयार केले आहे. आम्ही त्याविरोधात बोलतोय.

       

हाके यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत सांगितले की, आरक्षण गेलं तर गावगाड्यातील बलुतेदार काय करणार? महाराष्ट्र १८ पगड जातींचा आहे. बारामतीत आम्ही मोर्चा काढणारच, उशीर झालाय, पण रॅलीनेच जाणार.

त्यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावरही टीका केली. आम्ही तुम्हाला मत दिलं नाही का? मग आमच्या न्याय हक्काकडे का दुर्लक्ष करता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बारामती पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर आंदोलन पुढे ढकला, अशी विनंती पोलिसांनी केली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!