मोठी बातमी! संभाजी भिंडेंना अटक करा नाहीतर मी ठार करेल!! माजी मंत्र्याची थेट धमकी, देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र…


मुंबई : संभाजी भिडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माजी राज्यमंत्र्याने ही धमकी दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

भिडेंना अटक करा नाहीतर त्यांचा खून करणार असे सावजींनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत पत्रच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात त्यांच्याविरोधात रोष आहे.

तसेच संभाजी भिडेंच्या अटकेचीही मागणी विधीमंडळात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून त्यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यक्रम 3 ऑगस्ट रोजी चिपळूणमध्ये होणार होता.

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले आहे. पोलिसांनी भिडेंवर गुन्हा दाखल केलेला असून याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. यामुळे संभाजी भिडेंविरोधात राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!