धाराशिवच्या ‘कालिका ‘कलाकेंद्राच्या संचालकाच्या घरी सशस्त्र दरोडा ; धमकावून तब्बल 9 लाख लंपास


सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सोलापूर-धुळे महामार्गावरील चोराखळीमधील ‘कालिका ‘कला केंद्रावर सशस्त्र दरोडा पडल्याची माहिती समोर येत आहे. कला केंद्रकाच्या संचालकाच्या घरी घुसून धमकावून तब्बल नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सोलापूर धुळे महामार्गावर असलेल्या ‘कालिका’ सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिकांच्या घरी सहा जणांनी घुसखोरी करून पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल 9 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोराखळी येथील रहिवासी आणि कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला मोहन जाधव कलाकेंद्र बंद करून कारने चोराखळी येथे परतत होते. त्यावेळी एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचा संशय त्यांना आला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या घरी पोहोचल्या असता त्यांना धमकावून त्यांच्याकडून नऊ लाखाचा मध्ये मुद्दे माल लंपास करण्यात आला.

आरोपींनी निर्मला जाधव आणि रेखा शिंदे यांच्या अंगावरील सुमारे 121.600 ग्रॅम वजनाचे अंदाजे 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन सुमारे 3 लाख 49 हजार रुपये किंमतचे तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण 9 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!