नारळाच्या वाटणीवरून वाद, अल्पवयीन मुलांनी जिवलग मित्राचा गळा चिरला, घटनेने खळबळ..


लातूर : नारळाच्या वाटणीवरून झालेल्या वादातून अल्पवयीन मुलांनी आपल्याच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकी आली आहे. ही घटना लातूरमध्ये घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या औसा तालुक्यातल्या उजनी कमलापूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील नारळ तोडण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मित्रांमध्ये नारळाच्या वाटणीवरून वाद झाला.

या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. यात रितेश गिरी या १४ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. मृत रितेश गिरी हा आठवीमध्ये शिकत होता . रितेश आपल्या मित्रासोबत गावाशेजारी असणाऱ्या नारळाच्या झाडावरील नारळ तोडण्यासाठी गेले होते.

नारळ तोडल्यानंतर वाटणी करत असताना रितेश आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला. यावेळी रितेशची हत्या करण्यात आली. दरम्यान आरोपीने हा सगळा प्रकार झाल्यानंतर मृतदेह तुरीच्या गुळ्यात लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी भादा पोलिसांनी धाव घेतली.याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला भादा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!