तुमची मुलं पुण्यात बोगस शाळेत तर शिकत नाहीत ना? बोगस शाळांची नावे आली समोर…
पुणे : सध्या पुणे जिल्ह्यात एकूण 12 शाळा या अनाधिकृत असल्याचे समोर आले आहे. या 12 शाळांवर आता कारवाई करण्यात आली आहे. या 12 शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने देखील अनधिकृत शाळांची तपासणी केली. त्यात या 12 शाळा बोगस असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे
जिल्ह्यात अनधिकृत शाळांची यादीच जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. या शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
यामध्ये साई बालाजी पब्लिक स्कूल, नेरे (मुळशी), श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, वीर (पुरंदर) कल्पवृक्ष इंग्लिश मिडीयम स्कूल, किरकीटवाडी (हवेली) क्रेझ इंग्लिश मिडीयम स्कूल, कोल्हेवाडी (हवेली), किंडर गार्डन इंग्लिश मिडीयम स्कूल, खडकवासला (हवेली), मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल, दौंड, क्रेयांस प्री प्रायमरी स्कूल, कासुर्डी (दौंड)
तसेच के.के. इंटरनॅशनल स्कूल, बेटवाडी (दौंड), पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, लोणीकाळभोर (हवेली), जयहिंद पब्लिक स्कूल, भोसे (खेड), एस.एन.बी.पी. टेक्नो स्कूल, बावधान (मुळशी), अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे (मुळशी) या शाळांचा समावेश आहे.