UPI वरुन तुमचं डिजिटल पेमेंट होत नाहीय का? मग ही बातमी वाचाच..


नवी दिल्ली : शनिवारी सकाळी भारतातील युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस सेवेत मोठ्या तांत्रिक समस्येमुळे व्यत्यय आला. यामुळे देशभरातील वापरकर्त्यांना डिजिटल व्यवहार पूर्ण करता आले नाहीत.

यूपीआयमध्ये आलेल्या या अडचणीमुळे लाखो युजर्स डिजिटल पेमेंट करु शकत नाहीयत. अचानक झालेल्या या बिघाडामुळे PhonePe, Google Pay आणि Paytm द्वारे देण्या-घेण्याचे व्यवहार करणारे सर्वसामान्य आणि व्यापारी हैराण झाले आहेत.

डाउनडिटेक्टरच्या अहवालानुसार शनिवारी दुपारपर्यंत यूपीआय संबंधित समस्यांच्या सुमारे १,१६८ तक्रारी नोंदवण्यात आल्या. यापैकी गुगल पे वापरकर्त्यांनी ९६ समस्यांची नोंद केली. तर पेटीएम वापरकर्त्यांनी २३ समस्या नोंदवल्या. यूपीआय संबंधित अधिकाऱ्यांकडून किंवा नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून या ताज्या व्यत्ययाबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दरम्यान, याआधी २६ मार्चला सुद्धा यूपीआय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्निकल बिघाड झाला होता. त्यामुळे वेगवेगळ्या UPI APPS वरुन जवळपास २ ते३ तास ट्रांजॅक्शन करता आलं नव्हतं. नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया या समस्येच कारण टेक्निक्ल प्रॉब्लेम असल्याच सांगितलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य यूजर्स आणि व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंटमध्ये अडचण आली होती.

सध्या भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. कॅशचा वापर कमी होऊन UPI वरील अवलंबित्व वाढलं आहे. अशा स्थितीत एखाद्या दुकानात वस्तू विकत घेतल्यानंतर पेमेंट होत नसेल, UPI डाऊन दाखवत असेल तर ग्राहकाला मोठा झटका बसतो. कराण डिजिटल पेमेंट होईल म्हणून बँकेच्या एटीएममधून कॅश काढलेली नसते. अशावेळी समोरच्याला पैसे कसे द्यायचे हा प्रश्न निर्माण होतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!