नगरसेवक’ बेपत्ता ‘आहेत? पळवापळवीच्या प्रकरणावर अमित ठाकरेंची पोस्ट तुफान व्हायरल!

पुणे: राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदासाठी शिंदे आणि भाजप गटात अंतर्गत कुरघोडी सुरू आहे. अशातच आता ठाकरे आणि शिंदे गटाने नगरसेवक अज्ञातस्थळी ठेवले आहेत.या नगरसेवक पळवापळवीच्या प्रकरणावर मनसे नेते अमित ठाकरेंनी पोस्ट करत टीका केली आहे.

अमित ठाकरे यांनी असं म्हटलं आहे की,नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलं आहे, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत, असं म्हणत अमित ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांना टोला लगावला आहे.


मनसे नेते अमित ठाकरे यांनी एक व्यंगचित्र देखील आपल्या पोस्टवर व्हायरल केले आहे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी तमाशा चालू आहे.याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? असा सवाल देखील अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
