निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे शिक्षकांची नोकरी धोक्यात? थेट आयोगाला धाडले पत्र……


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या आहेत. त्यांच्या निर्णयामुळे शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने इलेक्शन ड्युटी करीत दमछाक झालेले शिक्षक आता निवडणुक आयोगाच्या एका निर्णयामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या नोकरीत अडचणी येण्याची शक्यता आता या निर्णयामुळे निर्माण झाली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा अन्‌‍ जिल्हा परिषद पंचायत समितीचे कर्तव्य एकाच वेळी आल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकीकडे आणि दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा एकीकडे अशी दोन्ही कर्तव्य अत्यावश्यक सेवेत येत असल्याने नेमके प्राधान्य कशाला द्यावे, या विचारात शिक्षक अडकले आहेत. कामाचा ताण वाढल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण आला आहे.

निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.या तारखा बदलल्याने शिक्षकांसमोर मोठ संकट उभे राहिले आहे.

दरम्यान केंद्रीय पात्रता शिक्षक परीक्षा 7 आणि 8 जानेवारीला होणार आहेत. यामुळे इलेक्शन ड्युटी लागल्यास परीक्षेला जायचे कसे असा प्रश्न शिक्षकांच्या समोर आहे. याबाबत अनिल बोरनारे (अध्यक्ष मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग मुंबई) यांनी निवडणूक आयोगाला पत्र धाडले आहे. यावर आता काय आयोग उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!