सोने-चांदी स्वस्त की महाग? काय आहेत आजचे दर? जाणून घ्या एका क्लिकवर…

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
सलग वाढीनंतर आज सोने-चांदीच्या किमतींमध्ये अचानक घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस थोडा दिलासादायक ठरू शकतो.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्याचे दिसून आले.9 मार्च 2026 रोजी सकाळी बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरांनी खालची पातळी गाठल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गगनाला भिडणाऱ्या किमतींनंतर आलेली ही घसरण गुंतवणूकदारांसाठी अनपेक्षित व महत्त्वाची ठरत आहे.
सोने (एप्रिल फ्युचर्स) – प्रति 10 ग्रॅम ₹1,107 ने घसरून ₹1,60,527
चांदी (मे फ्युचर्स) – प्रति किलो ₹5,248 ने घसरून ₹2,63,037
दरम्यान, बाजार तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीने उच्चांकी स्तर गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफा वसुली सुरू केली आहे. वाढलेल्या किमतीत विक्री वाढल्यामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला आणि दरात कपात झाली.
याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलर अधिक मजबूत होणे आणि बाँडच्या परताव्यातील बदल ही देखील या घसरणीची महत्त्वाची कारणे मानली जात आहेत.