सैराट मधील आर्ची होणार कोल्हापूरच्या महाडिकांची सून? रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिकांचा देवदर्शन करतानाचे फोटो व्हायरल…

कोल्हापूर : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक सध्या आपल्या समाजकारणामुळे चर्चेत आहेत. युट्युबवर त्यांचे मोठे चाहते असून यातून ते आलेले पैसे समाजसेवा करण्यासाठी वापरतात. सध्या कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरुन शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
या फोटोमुळे कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. याबाबत माहिती अशी की, कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे, सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा. यामुळे यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या फोटोला एक कॅप्शनही कृष्णराज महाडिक यांनी दिलं आहे. आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं, असे म्हटले आहे. त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात आला.
काही कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या रिंकू राजगुरूने महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडीकही होते. दोघांनी एकत्र दर्शन घेतल्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या फोटोवर लग्नाचे प्रश्न निर्माण केले जात आहेत.
अनेकांनी कमेंट करून थेट दोघांचं अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. रिंकू राजगुरूसोबत लग्न ठरलंय का? असा थेट प्रश्नही काही चाहत्यांनी कृष्णराज महाडिक यांना विचारला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरासमोर हा फोटो काढल्याने दोघांचे ठरले का? असे प्रश्न समोर येत आहेत. मात्र हा केवळ योगायोग असल्याचे सांगितले जात आहे.