शामीच्या गोलंदाजीचे पंतप्रधानांकडून कौतुक ..!
नवी दिल्ली : टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभूत करत २०२३ च्या फायनल मध्ये थाटात प्रवेश केला आहे. या सामन्यात ७विकेट्करी मोहम्मद शमीने उत्कृष्ट पद्धीतीने गोलंदाजी केली . शामीच्या गोलंदाजीवर भारतच नाय तर संपूर्ण जग फिदा झालं. शामीच्या गोलंदाजीचे संपूर्ण भारताने व भारताचे मानणिय प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि भरभरून कौतुक केले आहे.
सेमीफायनल नंतर नरेंद्र मोदींनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आजची सेमीफायनाल चांगली झाली ती शमीच्या उत्कृष्ठ कामगिरीमुळे, मोहम्मद शामीची तुफानी गोलंदाजी आपल्या भावी खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल, वेल प्लेड शामी असे मोदी यांनी ट्विट केले आहे .
मोहम्मद शमीचे कौतु पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह सर्व नेत्यांनी भारताच्या विजयाचे कौतुक केले आहे . यावेळच्या विश्वचषकात शमी ने २२ विकेट्स घेतल्या आहेत .न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट गोलंदाजी नंतर त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियानं पहिल्यांदा फलंदाजी करत ३९७ धावांची मोठी धावसंख्या न्यूझीलंड समोर उभारली . या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ३२७ धावांवर येऊन थांबला . भारतीय संघाचा विश्वचषक २०२३ मधील हा सलग दहावा विजय मिळविला. भारताकडून मोहम्मद शामीनं ५७ धावांत ७ विकेट्स फटकावल्या. पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, असे अनेक नेत्यांनी भारताच्या विजयाचे अभिनंदन केले.