वाळवा तालुक्यातील सुनेचं कौतुक; सासूच्या उपचारासाठी 38 तोळ सोन अन शेत जमिनीवर सोडलं पाणी…

सांगली : वाळवा तालुक्यातील कुरळप गावातील मायादेवी सुधीर कामेरीकर यांनी आपल्या सासूच्या उपचारासाठी जीवाचं रान केलं आहे. त्या मुलुंड येथे पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सासू कामेरीकर काही महिन्यापासून यकृताच्या आजाराशी झुंज देत होत्या. डॉक्टरांनी आशा सोडली होती,पण माझ्याजवळ शेवटचा रुपया असेपर्यंत मी सासूला काही होऊ देणार नाही असा निश्चय मायादेवी यांनी केला. आणि त्यांनी कोणासही काही न सांगता स्वतःच्या 38 तोळ सोन्यावर कर्ज काढले स्वतःच्या नावावर असणारी जमीन विकली आणि सासूवर ताबडतोब उपचार केले.

आकाशी कामेरीकर यांच्या ऑपरेशनसाठी डॉक्टरांनी मोठा खर्च सांगितला होता. त्यांची सून मायादेवी सुधीर कामेरीकर यांनी कोणासही काही न सांगता स्वतःच्या 38 तोळ सोन्यावर कर्ज काढले स्वतःच्या नावावर असणारी जमीन विकली. तसेच स्वतःच्या पगारावर साठ लाख कर्ज काढून त्या पैशातून सासूची तातडीने उपचार सुरू केले. तसेच बँकेत ठेवलेले 38 तोळ सोन न सोडवल्याने मोडीत निघाल.जमीन गेली,कर्जाचा डोंगर वाढला,परंतु सर्व परत येईल पण सासूबाई वाचल्या हे लाखमोलाच अशी भावना मायादेवी यांच्या बोलण्यातून जाणवले.

दरम्यान या वाळवा तालुक्यातील कुरळप गावच्या सासु सुनेचे नातं आई आणि लेकीचं झालं. सासूच्या उपचारासाठी सुनेची होणारी धडपड पाहून मायादेवी कामेरीकर यांचा सर्वत्र कौतुक होत आहे.

