पुण्यात राष्ट्रवादीमध्ये फूट, मोठी बातमी आली समोर


पुणे : पुण्यातील मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे समर्थक देवदत्त निकम यांनी या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली आहे. निकम यांनी वेगळे पॅनल उभा केले आहे. यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

यामुळे आता देवदत्त निकम यांची पक्षातून हकालपट्टी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचा आदेश न मानता निकम यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे.

वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक देवदत्त निकम यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. देवदत्त निकम यांनी मात्र आपण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असे त्यांनी जाहीर केले होते.

ते म्हणाले होते की, राष्ट्रवादी पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणे, त्यांच्या मुलाखती घेणे. या सर्व प्रक्रियेत मी होतो. पण मला उमेदवारी नाकारल्याने दु:ख झाले असून मानसिक धक्का बसला आहे.

मंचर बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंध असणाऱ्या आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसध्ये गटबाजी उफाळून आली आहे. यामुळे आता निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!