पुण्याकडे कोणाचे लक्ष आहे का? एका रात्रीत ४० गाड्या फोडल्यात, शहरात तोडफोडीचं सत्र सुरूच, नागरिक हैराण…

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
अशातच मंगळवारी रात्री दत्तवाडी, लक्ष्मी नगर, पर्वती परिसरात तब्बल ४० गाड्यांची तोडफोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात गाडी तोडफोडीचे सत्र सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड केली गेली.
काल रात्री ४० गाड्या फोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील दत्तवाडी, लक्ष्मीनगर, पर्वती परिसरात ही घटना घडली. चार चाकी आणि रिक्षाची तोडफोड केल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील घटना घडल्याने आता पोलीस यंत्रणा देखील खडबडून जागी झालीये. आज सकाळी सात ते आठ वाहनांची केली तोडफोड केल्याची माहिती देखील मिळतीये. दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.
मागील आठवड्यात बी. टी. कवडे रोड येथे कोयता गँगची दहशत निर्माण करण्यासाठी ५० वाहनांची तोडफोड केली गेली होती. तर काल येरवड्यात देखील गाड्याची तोडफोड केल्याचं समोर आले होते.