पुन्हा एक भीषण विमान अपघात!! ४९ जणांचा मृत्यू, ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्यानंतर डोंगरात कोसळलं..


विमान अपघाताच्या संख्येत सध्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात 250 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला होता. असे असताना चीनच्या सीमेजवळील अमूर प्रदेशात 49 प्रवासी घेऊन निघालेलं एक रशियन प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा या भीषण विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे. विमानात पाच मुलांसह 43 प्रवासी आणि सहा क्रू सदस्य होते. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अजून माहिती समोर आली नाही. याबाबत तपास सुरू आहे. विमानातून प्रवास करणारे प्रवासी जीवंत असल्याची कोणतीही चिन्ह दिसलं नाही.

याबाबत हेलिकॉप्टरमधून पाहणी करण्यात आली आहे. डोंगरावर रशियन प्रवासी विमानाचे जळलेले अवशेष बचाव पथकाला आढळले आहेत. अंगारा एअरलाइन्सचे Antonov-24 हे विमान होतं. उड्डाण केल्यानंतर ते टिंडा इथे पोहोचण्यापूर्वी हवाई वाहतूक नियंत्रकांशी विमानाचा संपर्क तुटला.

यामुळे हा अपघात झाल्याचे दिसून आले आहे. तात्काळ शोधमोहिम सुरू करण्यात आली, अशी माहिती स्थानिक आपत्कालीन मंत्रालयाने दिली. खराब दृश्यमानतेमुळे, वैमानिकाच्या चुकीमुळे हे विमान क्रॅश झाल्याची माहिती रशियन वृत्तसंस्थेने दिली आहे.

अमूर येथील नागरी संरक्षण संस्थेने घटनास्थळी बचाव पथकं पाठवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. याबाबत सध्या तपास सुरू असून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा सखोल तपास केला जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!