शरद पवार यांच्या स्मरणशक्तीचा आणखी एक प्रत्यय.! तु कोंडाजी वाघ ना, सहकाऱ्याला गर्दीत ओळखले..!!

जुन्नर : शरद पवार यांनी वयाचा ८३ वा टप्पा गाठला आहे. देशभरात या वयात सक्रिय राजकारणात असलेल्या शरद पवार यांची सतत लोकांत कार्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्यात आहे. ते आजही राज्यासह देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची एकतेची मोट बांधत आहे, तर दुसरीकडे आपलेच पुतणे यांनी बंडखोरीचे केलेले आव्हान मोडीत काढण्यासाठी पवार हे रिंगणात उतरले आहे.
त्यांच्या राजकीय जीवनात प्रचंड इच्छाशक्तीची झलक आपण पाहत आलो आहोत, त्याचबरोबर यावयात त्यांची स्मरणशक्ती ही किती, दांडगी आहे. याचा प्रत्यय ते आपले जुणे सहकारी, यांना क्षणात ओळखून करुन देत असल्याचे आपण पाहिले आहे. असाच त्यांच्या स्मरणशक्तीचा परिचय पुन्हा आला आहे.
जुन्नर तालुक्यातील एका जाहीर सभेत शरद पवार बोलायला उठले. त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा अचानक सभेतून सुरू झाल्या. शरद पवारांनी काही क्षणच पुढे पाहिले आणि बोट दाखवत कोंडाजी वाघ का? असा प्रश्न केला. पुन्हा काही क्षण थांबून त्यांनी शेजारच्या पदाधिकाऱ्यांना हे कोंडाजी वाघच आहेत का? असा पुन्हा प्रतिप्रश्न केला. गर्दीतून कोणीतही हो तेच आहेत असे उत्तर दिले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
आंबेगाव तालुक्यातील राझणी गावचे कोंडाजी रामजी वाघ यांनी शरद पवार यांनी दिलेल्या ओळखीला अगदी सहजपणे घेतले. कोंडाजी म्हणाले, शरद पवार मंत्री असताना अनेकदा मुंबईला जाऊन भेटलो आहे. शेतकऱ्यांचे जिवाचे नेते आहेत असे सांगितले.
पाठीमागे एकदा दौंड तालु्क्यातील सभेत गर्दीत दूर अंतरावर एक व्यक्ती बसलेली होती, शरद पवार यांनी त्या व्यक्तीकडे बोट दाखवून व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्यास त्यांना बोलावण्यास पाठवले आणि तू भिवा शेलार का रे? असा प्रश्न करीत आपल्या मित्रास ओळखले होते. त्यामुळे ८३ व्या वयातही पवार हे आपले जुणे सहकारी ओळखत असल्याचे उदाहरण पुढे आले आहे. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती किती दांडगी आहे हे स्पष्ट झाले आहे.