विमान लँड होत असताना रनवेवर आले दुसरे विमान! पायलटच्या हुशारीने अनेक प्रवाशांचे वाचले प्राण, नेमकं काय घडलं?

शिकागो : काही दिवसापूर्वीच अमेरिकेत दोन विमान अपघात झाले होते. यामध्ये ६ फेब्रुवारी रोजी अलास्कामध्ये झालेल्या एका प्रवासी विमानाच्या अपघाताचा समावेश आहे. यामध्ये सर्व १० जणांचा मृत्यू झाला होता. २६ जानेवारी रोजी वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळावर आर्मी हेलिकॉप्टर आणि अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाची टक्कर झाली, यामध्ये ६७ जणांचा मृत्यू झाला होता.

असे असताना आता पुन्हा एकदा एक मोठा विमान अपघात होता होता राहिला आहे. शिकागोमध्ये एक मोठा विमान अपघात घडला असता. पायलटच्या सतर्कतेमुळे हा अपघात टळला. शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचे लँडिंग सुरू होते. तेवढ्यात अचानक दुसरे विमान आले.
यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. या दोन्ही विमानात मिळून शेकडो प्रवासी प्रवास करत होते. पायलटच्या एका निर्णयामुळे या सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. यामुळे अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान, शिकागो विमानतळावर पायलटला धावपट्टीवर एक जेट विमान दिसले.

हे विमान दिसताच पायलटने वेळ वाया न घालवता विमान पुन्हा एकदा आकाशात उडवले. वैमानिकाच्या सतर्कतेमुळे अपघात टळला. जेव्हा विमान पुन्हा हवेत झेपावले तेव्हा प्रवाशांनाही आश्चर्य वाटले. नंतर त्यांना खरा प्रकार समजला. यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे.
काही काळ विमानातील प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत आता विमान कंपनीकडून निवेदन आले आहे. साउथवेस्ट फ्लाइट २५०४ सुरक्षितपणे उतरले आहे, असे यात सांगण्यात आले आहे. यामुळे मोठी दुर्घटना होता होता राहिली आहे.