हवेली मोजणी कार्यालयाच्या कारभाराबाबत आणखी एक गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?


पुणे : मोजणी अर्जदाराला चुकीची क प्रत नकाशा दिल्याने अर्जदाराचे नुकसान केल्याप्रकरणी हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक व भूकरमापक यांच्यावर येरवडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे भूमि अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

हवेलीचे तत्कालीन उपअधिक्षक शिवप्रसाद गौरकर व तत्कालीन भूकरमापक आकाश माने यांनी चुकीच्या मोजणीची क प्रत दिल्याने त्यांच्यावर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा प्रकार २३ जानेवारी २०२० रोजी पासून आजपर्यंत घडला आहे. हवेली मोजणी कार्यालयाच्या कारभारावरुन पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होत असल्याने मोजणी कार्यालयाची उरली सुरली अब्रुही चव्हाट्यावर आली आहे.

मोजणी अर्जदार संतोष जानकीराम रॉय यांना आपल्या जागेत बांधकाम करायचे होते. त्यासाठी त्यांनी सरकारी मोजणी मागवली होती. मात्र हवेली मोजणी कार्यालयाने त्यांची मोजणी केली नव्हती. त्यामुळे अर्जदार रॉय यांनी मोजणी कार्यालयाच्या विरोधात नॅशनल कमिशन फॉर शेडयुल कास्ट, दिल्ली येथे तक्रार दाखल केली होती. त्याची तातडीने आयोगाने दखल घेत पुणे जिल्हाधिकारी यांना मोजणी प्रकिया पूर्ण करुन रॉय यांची जागा काढून देणे बाबत आदेशीत केले होते.

दरम्यान, त्यामुळे हवेलीचे मोजणी कार्यालय खडबडून जागे झाले व भूकरमापक आकाश माने यांनी सदरची मोजणी केली होती. मात्र संबंधित मोजणीचा क प्रत नकाशा तयार करताना चुकीचा सर्व्हे नंबर टाकला. चुकीचा सर्व्हे नंबरच्या आधारे क प्रत तयार करुन फिर्यादीची जागा नकाशावर न दाखवता तत्कालीन उपअधिक्षक शिवप्रसाद गौरकर यानी सदरच्या कागदपत्रांची पडताळणी न करता क प्रतवर सही केली आहे.

त्यामुळे मोजणी अर्जदार संतोष रॉय यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीस उपअधिक्षक शिवप्रसाद गौरकर व भूकरमापक आकाश माने हे जबाबदार असल्याने येरवडा पोलिस स्टेशनला नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!