उद्धव ठाकरे यांना अजून एक मोठा धक्का, आणखी एका बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील…

मुंबई : पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून शिवसेना पक्ष वाढिसाठी प्रयत्न करू असेही तृष्णा विश्वासराव म्हणाल्या.
मुख्यमंत्री कनाथ शिंदे यांचे ट्विट..
तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची #शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
तृष्णा विश्वासराव यांचे मनापासून स्वागत. सातत्याने नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या. सभागृहनेत्या, विभाग प्रमुख, संपर्कप्रमुख अशा जबाबदाऱ्या त्यांनी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडल्या असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.