काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! महत्वाची माहिती समोर, राजकीय समीकरण बदलणार…

अमरावती : राज्याच्या राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय समीकरण जुळवण्याची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान त्यानंतर लगेचच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो, महापालिका निवडणुका देखील होणार आहेत.

आता या सर्व पार्श्वभूमीवर पक्षांतराला जोरदार वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला.

महायुतीला मोठं यश मिळालं, दरम्यान या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमधून महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाल्याचं पहायला मिळालं होतं, हे इनकमिंग अजूनही सुरूच आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.
दरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अमरावतीच्या तिवसा मतदार संघात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे, माजी जिल्हा परिषद सदस्य अलका देशमुख आणि सहकार नेते मनोज देशमुख यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षात प्रवेश केला आहे.
कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व जणांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे, दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आता काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
