बारामतीत पवार कुटुंबियांकडून आणखी एक अर्ज! डमी अर्जाने पवार कुटुंबात दरी वाढणार काय?
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाकडे तमाम राज्याचे लक्ष्य लागले आहे . यंदा पवार कुटुंबीयात अटीतटीची लढत होत आहे. खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीत कोणाचा विजय होणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले लक्ष्मण खाबिया यांनी सुनंदा पवार यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. सुनंदा पवार या शरद गटाचे नेते रोहित पवार यांच्या आई आहेत.
सुनंदा पवार यांचा भीमथडी जत्रा आणि बारामती अॅग्रोच्या माध्यमातून चांगला जनसंपर्क आहे. लोकसभेचा अर्ज भरल्याने सुनंदा पवार या चर्चेत आल्या आहेत.
Views:
[jp_post_view]