पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा आणखीन एक कारनामा उघड ; साळवे कुटुंबावर हल्ल्यामागे मोठा हात


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर असलेला पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरपीआय (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे आणि त्यांच्या कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामागे घायवळचा हात असल्याचं पोलिस तपासात उघड झाले आहे. या हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपावरून घायवळ आणि त्याचा साथीदार ऋषी गायकवाड या दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे.

कोण आहे निलेश घायवळ?

नीलेश घायवळ हा मूळचा सोनेगाव (ता. जामखेड) येथील असून, पुणे शहरात त्याच्यावर खून, खंडणी, दहशत माजविणे, मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपासून परदेशात पसार झाला होता. त्याचा पासपोर्ट अहिल्यानगर शहरातील आनंदी बाजार परिसरातील पत्त्यावर तयार झाल्याचे समोर आले आहे परंतु तो तिथे कधीच राहत नव्हता.

निलेश घायवळवर दाखल असलेले गुन्हे

१. कोथरूड गोळीबार प्रकरण

२. कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणी

३. घरावर छापेमारी करण्यात आली त्यावेळी घायवळ याच्या घरी जिवंत काडतुसे सापडले होते

४. बनावट नंबर प्लेट

५. पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्रे दिली

६. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांनी १० फ्लॅट नावावर करून घेत खंडणी मागितली

७. सिम कार्ड दुसऱ्याच्या नावाने वापरले

८. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स बनवल्या प्रकरणी

९. घायवळचा साथीदार मुसा शेख गांजा तस्करी प्रकरण

१०. एका कंपनी कडून ४५ लाख रुपयांची खंडणी वसूली प्रकरणी

समोर आलेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्टची रात्री नान्नज (ता. जामखेड) येथे बाजारतळ परिसरात रात्री 11 वाजता 12 ते 14 हल्लेखोरांनी साळवे कुटुंबावर लाठ्या, दगड आणि लोखंडी गजाने हल्ला चढवला. या हल्ल्यात यशदीप साळवे गंभीर जखमी झाला, तर महिलांवरही निर्दयी मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अभिजित साळवे यांच्या फिर्यादीवरून 14 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून 9 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीतून हल्ल्यामागील सूत्रधार नीलेश घायवळ आणि त्याचा साथीदार गायकवाड असल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्याच्या अडचणीत आता आणखीनच वाढ होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!